फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजूपर येथे प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र अनिल चौधरी यांच्या प्रमुख उपस्थित दिलीप कोळी, भाजपाचे पप्पू वैद्यराज व त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला..
यावेळी भाषणात अनिल चौधरी म्हणाले पक्ष संघटना बळकट करण्यासाठी अनेक पदाधिकारी व नेते पुढाकार घेत आहेत. पक्षात पुढची पिढी यायला हवी ज्यांना जातीयवादाचा स्पर्श नसावा. आपला पक्ष सेक्युलर विचारांचा आहे. इथे आपल्याला सन्मानाची वागणूक दिली जाईल, आगीतून येऊन फफूट्यात पडलो अशी वेळ कोणावरही येऊ देणार नाही, असा विश्वास अनिल चौधरी यांनी नवीन सदस्यांना दिला..
पक्ष प्रवेश सोहळ्यात दिलीप कोळी, संतोष कोळी, भिका कोळी, शशिकांत कोळी, अजय कोळी, रुपेश कोळी, मगन कोळी, जाकीर खाटीक, रामा कोळी, समाधान कोळी, किशोर हटकर, अक्षय कोळी, युवराज कोळी, ललित हटकर, विजय कोळी, भास्कर कोळी, विकी गलवाडे, अरुण कोळी, मोहन कोळी, सागर कोळी, तुषार कोळी, सुपडू कोळी, मुकेश कोळी, विशाल कोळी, विजय कोळी, महेंद्र कोळी, पंकज कोळी, बापू कोळी, अतुल कोळी व असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
फैजपूर माजी नगरसेवक प्रभाकर सपकाळे, फैजपूर माजी नगरसेवक राजू तायडे, माजी नगरसेवक सुनील वाढे, प्रहार जिल्हा संघटक आरिफ शेख, भुसावळ शहराध्यक्ष खन्ना कोळी, अल्पसंख्याक शहराध्यक्ष मोहसीन शेख, युवक शहराध्यक्ष विजय मिस्त्री, सहचिटणीस विक्की काकडे, सोशल मीडिया प्रमुख सचिन कोळी, पिंटू मंडवाले तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.