मनसे लोकसभेच्या रिंगणातून बाहेर

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असून याबाबत एका पत्रकान्वये माहिती देण्यात आली.

गत काही दिवसांपासून महाआघाडीत मनसेचा प्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू होती. मनसेला दोन्ही काँग्रेस एक जागा सोडणार असल्याचेही मानले जात होते. तथापि, काँग्रेसने मनसेच्या महाआघाडीतील सहभागाला आक्षेप घेतला होता. या अनुषंगाने आज मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभेच्या रिंगणात आपला पक्ष कोणताही उमेदवार उतरवणार नसल्याची घोषणा केली. याचे पत्रक जारी करण्यात आले आहे. यामुळे आता राज ठाकरे महाआघाडीसाठी प्रचार करणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Add Comment

Protected Content