मास्कवरून आता मनसे देणारे फेसबुक लाईव्हमधूनच उत्तर !

मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांचा नामोल्लेख न करता ते मास्क वापरत नसल्यावर टीका केल्यानंतर आता याला मनसेने फेसबुक लाईव्हच्याच माध्यमातून उत्तर देण्याची घोषणा केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मी मास्क घालत नाही, असे जाहीरपणे सांगितले होते. त्यावरुन, मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात नाव न घेता टोला लगावला. अनेकजणांना असं वाटतंय, ये मास्क का लावतोय तू. पण, मास्क न लावण्यात शौर्य काय, मी मास्क वापरणा नाही, मग काय शूर आहेस का? असा प्रश्न विचारत खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी कुणाचेही नाव न घेता लगावला. मास्क न लावणे यात शूरता नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या लाईव्हनंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ”मुख्यमंत्री साहेब, तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका…किंबुहना ऐकाच ! उद्या सकाळी 11 वाजता फेसबुक लाईव्ह.”, असे ट्विट देशपांडे यांनी केलंय. म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या भाषेचा आपल्या ट्विटमध्ये उल्लेख करत, त्यांनी 11 वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचं सूचवलं आहे.

Protected Content