Home Cities यावल मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी यावलमधून कार्यकर्ते रवाना

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी यावलमधून कार्यकर्ते रवाना

0
64

यावल प्रतिनिधी । उद्या मुंबई येथ महाराष्ट्र नवनिर्माण च्या होणार्‍या गुडी पाडव्या च्या मेळाव्यास यावल रावेर या तालुक्यातुन अनेक मनसे कार्यकर्ते रवाना झाले असल्याची माहिती महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे यावल तालुका सचिव संजय नन्नवरे मनसेचे यावल शहराध्यक्ष चेतन अढकर यांनी दिली आहे.

मुंबई येथील दादरच्या छत्रपती शिवाजी मैदानावर सांयकाळी ५ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या गुढीपाडवा मेळाव्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे लाखो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना ते संबोधीत करणार आहेत. मनसेच्या या गुढी पाडवा मेळाव्यास लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर फारच महत्व प्राप्त झाले असुन महाराष्ट्रच्या गल्लीपासुन तर दिल्ली पर्यंत या मेळाव्या ची चर्चा असुन राज ठाकरे हे कार्यकर्त्यांना काय आदेश देतात या कडे सर्वेच राजकीय मंडळीचे लक्ष लागुन आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound