अभिमानास्पद : पाचोर्‍याचा मनोज महाजन युपीएससीत उत्तीर्ण; आयएएसपदी निवड !

पाचोरा/अमळनेर प्रतिनिधी । येथील मनोज सत्यवान महाजन हा युवक युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाला असून त्याची आयएएस वर्गवारीत निवड करण्यात आली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससीच्या मुख्य परिक्षेचा आज निकाल लागला. यात पाचोर्‍याचा मनोज़ सत्यवान महाजन दशात १२५ वा आला असुन त्याची आयएएस वर्गवारीत निवड झाली आहे. यापूर्वी त्याची २०१६ साली युपीएससीद्वारे रेल्वे सुरक्षा बलात सहाय्यक आयुक्त म्हणून उच्चश्रेणी वर्ग १ अधिकारी पदी नियुक्ती झाली होती. मनोज महाजन याचे वडील सत्यवान महाजन हे गाळण आश्रमशाळेत शिक्षक आहेत. मनोजने दुसरी पर्यंत शिक्षण गाळण येथे केने ,दहावीपर्यंत शिक्षण पाचोरा येथील पी के शिंदे शाळेत केले दहावीला त्याला ९१% गुण मिळाले होते. बारावी एम. जे. कॉलेज जळगाव येथुन केले बारावीला त्याला ९२% गुण मिळाले राज्यातील अग्रमानांकित सीओइपी कॉलेज पुणे येथुन त्याने बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन मधुन विशेष प्राविण्यासह पूर्ण केले. अनेक माजी आयएएस व आयपीएस अधिकार्‍यांपासून प्रेरणा घेऊन त्यांनी अभ्यास केला. सध्या तो इतिहासात एम. ए. करीत आहे.

मनोज महाजन यांना वडिलांचा ध्येयवेडापणा व परिश्रम,आई भाऊ बहिण यांचा विश्‍वास यातून यश लाभले आहे. चाणक्य मंडळाचे अविनाश धर्माधिकारी हे त्यांचे आदर्श आहेत. त्याला धर्माधिकारी सर ,महेश भागवत सर, विवेक कुलकर्णी सर, बलियान सर , चिंचोले सर ,महेश शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा राजेंद्र चिंचोले यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. तसेच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Add Comment

Protected Content