छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा |मराठा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खराब झाली आहे. त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी चार जून नंतर पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, आठ जून रोजी भगवानगड म्हणजेच बीड जिल्ह्यात होणारी त्यांची सभा रद्द करण्यात आली आहे.
मराठा आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरेची मागणी पुन्हा एकदा करत असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी त्यांनी चार जून पासून उपोषणाचा इशारा दिला आहे. मात्र, त्या आधीच त्यांची प्रकृती खराब झाल्याने उपोषणाचा निर्णय रद्द होतो की, ते पुन्हा एकदा उपोषणाला सुरूवात करतात, ते पाहावे लागेल. त्यांच्या डॉक्टरांनी मात्र, त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांना थ्रोट इन्फेक्शन झाले असल्याची माहिती देखील त्यांच्या डॉक्टरांनी दिली आहे. तसेच इतरही काही तपासण्या करण्यात आल्या असून त्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
मनोज जरांगे यांची प्रकृती अचानक खालावली
7 months ago
No Comments