अहमदनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे ४ जूनपासून पुन्हा एकदा उपोषणासाठी बसणार आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण करू नये, डॉक्टरांनी त्यांना उपोषण करू नये असा सल्ला दिला आहे. आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा आदेश द्यावा आम्ही पाठीमागे आहे अशी भूमिका अहमदनगर येथील मराठा बांधवांनी घेतली आहे.
मराठा बांधव म्हणून मनोज जरांगे साहेबांना आमची मागणी आहे की, त्यांनी उपोषण करू नये. तुम्ही रस्त्यावर उतरून लढण्याचे आदेश द्या, तुमच्या पाठीशी मराठा समाज खंबीरपणे उभा राहील. तुम्ही जी रणनिती ठरवाल त्याचे मराठा समाज पालन करेल. डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण न करण्याचा सल्ला दिला आहे. एक दिवस देखील उपोषण करू नये असे डॉक्टरांनी म्हटले आहे. त्यामुळे सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा आणि आता लोकसभेतून मराठा समाजाची ताकद काय आहे, हे सरकारला कळेलच, अशी मागणी यावेळी मराठा बांधवांनी केली.