मानमोडी येथील महिलांचे शौचालयाच्या कामात अनागोंदी कारभार

 

 

बोदवड सुरेश कोळी । तालुक्यातील आदर्शगाव मानमोडी येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधण्यात आलेले महिलांचे शौचालय निव्वळ पाण्यात गेले असून केलेल्या कामात अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचार झाल्याची ओरड नागरीकांकडून केली जात आहे.

तालुक्यातील आदर्शगाव मानमोडी येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नुकतेच महिला शौचालय बांधण्यात आले. सदरच्या शौचालयावर करण्यात आलेला शासनाचा खर्च निव्वळ पाण्यात गेल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीकडून जेथे शौचालय बांधण्यात आले. ती जागा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असल्याची शंका नाकारता येत नाही.त्यामुळे भविष्यात जेथे जागाचा वाद उद्भवण्याची शंका नाकारता येत नाही. तसेच बांधण्यात आलेल्या शौचालया ठिकाणी वरती टाकीसाठी स्वतंत्र कॅबिन बांधण्यात आली नसून टाकीवरतीचे कॅबिन उभी केली आहे. विशेष म्हणजे येथे शौचालय बांधण्यात आले येथील जागा दलदल असून भविष्यात हे शौचालय पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आणि गंभीर बाब म्हणजे येथे शौचालय बांधण्यात करण्यात आले तेथे शौचालय (आऊट – लेट) पिण्याच्या पाण्याच्या बोअरवेल पासून ५० ते ६० फुटांवर आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीकडून गावात बांधकाम केलेले महिला शौचालय निव्वळ शासनाचा निधी हडपण्यासाठी तर केले नाही ना?असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे पंचायत समितीचे बांधकाम अभियंता यांनी शौचालय बांधकाम करण्याआधी जागेची पाहणी, शासनाचे नियम, अटी आर्थिक लाभापोटी कागदावर दाखवून आपली आर्थिक पोळी तर शेकल्याचा प्रकार समोर आला आहे. शौचालय बांधकाम करतांना विविध अटी – शर्ती शासनाने लावून दिल्या आहेत. मात्र येथे शासनाने नियम पायदळी तुडवून आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी शौचालय बांधण्यात आल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. भविष्य शौचालयामुळे पिण्याचे पाणी दूषित होवून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदार कोण असा सवाला ग्रामस्थांकडून केला जात आहे.

Protected Content