Home Cities जळगाव …म्हणून शिवसेनेच्या मंगला बारी यांनी केले मुंडण ! (पहा व्हिडीओ)

…म्हणून शिवसेनेच्या मंगला बारी यांनी केले मुंडण ! (पहा व्हिडीओ)

0
44


जळगाव प्रतिनिधी । पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत शहिदांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आज शिवसेनेच्या मंगला बारी यांनी मुंडण केले. त्यांची ही अनोखी श्रध्दांजली चर्चेचा विषय बनली आहे.

शिवसेना महिला आघाडीतर्फे आज पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. महापालिकेसमोर आघाडीच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी पाकच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. याप्रसंगी मंगला बारी यांनी मुंडण करून अनोखा निषेध व्यक्त केला. याप्रसंगी जोरदार घोषणांच्या निनादात मंगला बारी यांचे मुंडण करण्यात आले. मुंडण झाल्यानंतर याबाबत माहिती देतांना मंगला बारी यांना अक्षरश: अश्रू अनावर झाले. शहीद जवानांच्या हौतात्म्याने अवघा देश शोकसंतप्त झाला असून पंतप्रधान मोदी यांनी आता पाकला धडा शिकवण्यासाठी पावले उचलावी अशी अपेक्षा मंगली बारी यांनी व्यक्त केली.

पहा- मंगला बारी यांच्या अनोख्या निषेधाचा हा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound