मंगेश चव्हाण यांची ग्रामीण भागात संवाद सभा

72579430 391423951779271 3034444641446395904 n

चाळीसगाव, प्रतिनिधी | महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी आज तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचार दौरा केला. त्यांच्या प्रचार दौऱ्यात आबालवृद्ध सहभागी होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

आज गुरुवार (दि. १७ ) रोजी मंगेश चव्हाण यांनी आपल्या प्रचार झंझावात सुरु ठेवला होता. यात त्यांनी आज तालुक्यातील पिंपरखेड, शिवापूर, चंडिकावाडी, पाटणा, गोरखपूर, वलठाण अशा विविध गावांना भेट देऊन उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ठिकठिकाणी घेतलेल्या संवाद सभेमध्ये परिसरातील लहानमुले महिला व कार्यकर्ते यांचा समावेश मोठया प्रमाणात पहायला मिळाला. यावेळी भाजपा व महायुती मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Protected Content