Home Cities चाळीसगाव मंगेश चव्हाण यांचा उद्या मतदार संघातील १७ गावांना भेट देणार

मंगेश चव्हाण यांचा उद्या मतदार संघातील १७ गावांना भेट देणार


mangesh chavhan 2

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार मंगेश चव्हाण हे उद्या (दि.१०) तालुक्यात झंझावाती दौरा करणार आहेत. एकाच दिवसात ते १७ गावांना भेटी देवून मतदारांच्या गाठी-भेटी घेणार आहेत.

 

उद्या सकाळी त्यांचा दौरा भोरस गायरान येथून सकाळी ९.०० वाजता सुरु होणार असून सकाळच्या सत्रात दसेगाव, मेहुणबारे, तिरपोळे, वरखेडे बु. या गावांना ते भेट देतील. दुपार सत्रात दरेगाव, रामनगर, विसापूर, लोंढे, पळासरे व चिंचगव्हाण तर सायंकाळी दहीवद, खडकी सिम, धामणगाव, भऊर , जामदा व भवाळी या गावांना ते भेटी देणार आहेत.


Protected Content

Play sound