चाळीसगाव प्रतिनिधी । राज्य विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज जाहीर केलेल्या १२५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत चाळीसगाव मतदार संघातून युवानेते मंगेश चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे एकच जल्लोष करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यात समाज कार्यात अग्रेसर असलेल्या मंगेश चव्हाण यांना चाळीसगावातून उमेदवारी मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. त्यांचे नाव पहिल्याच यादीत नाव जाहीर झाल्याने समर्थकांमध्ये आनंद साजरा केला जात आहे.