मम्मा देवी प्रशिक्षणार्थींनी जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पटकावली ८ सुवर्णपदके

शेंदुर्णी ता. जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथे झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत श्री मम्मादेवी तायक्वांडो प्रशिक्षणार्थींनी घवघवीत यश मिळवित ८ सुवर्ण पदक, २ रौप्य आणि ५ कास्य पदक पटकविले आहे.

युथ गेम कांऊसिल जळगावच्या वतीने सदर स्पर्धेचे आयोजन पाचोरा येथे करण्यात आले होते. जिल्हा तायक्वांदो डायरेक्टर अजीत घार्गे, जिल्हा सचिव सुनिल मोरे, योगेश पाटील आणि जिल्हाभरातील तायक्वांदो प्रशिक्षक यांनी स्पर्धेचे आयोजन करून स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये ५ गृप होते. अंडर 14, अंडर 17, अंडर 19, अंडर २१, आणि अंडर २३ असे गृप होते.

मम्मादेवी तायक्वांदो वर्गाचे संचालक प्रशिक्षक अॅड श्रीकृष्ण देवतवाल यांनी परीश्रम घेतले असून गोल्ड मेडल मिळविलेल्या खेळाडूंची निवड औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झालेली आहे.  त्यासोबत खेळाडूंच्या वजनाचा गट तयार करण्यात आला होता. तायक्वांदो मध्ये घवघवीत यश मिळावील्याने विजेत्या खेळाडुंचे आणि त्यांचे प्रशिक्षक ऍड. श्रीकृष्ण देवतवाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सुवर्ण पदक विजेते खेळाडू –
१) आर्यन शांताराम वानखेडे
२) ओम सुनील गोंधळी
३) साई सुरेश भोई
४) वैष्णवी लक्ष्मण पाटील
५) जय सोमनाथ गुजर
६) साहिल अनवर बेग
७) मुबारक अनवर बेग
८) आकाश बेलदार

रौप्य पदक विजेते खेळाडू –
१) वैभव शैलेंद्र गुजर
२) भावेश रवींद्र चौधरी

कांस्य पदक विजेते खेळाडू –
१) सिद्धार्थ मनोज कुमावत
२) हार्दीक शितल जैन
३) दर्शन उमेश बारी
४) चेतन सुनील गोंधळी
५) कार्तिक पाटील (जंगीपुरा)

 

 

 

Protected Content