जळगाव प्रतिनिधी । साळवा येथून औरंगाबादकडे धान्याची गाडीतून जात असतांना एरंडोल जवळ गाडी कलंडल्याने तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी 9 ते 10 वाजेच्या सुमारास घडली असून तिघांना जळगावातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, अरूण सोमा अत्तरदे (वय-55), युवराज बाबुराव पारधी (वय-58) आणि कैलास जगन्नाथ बहाडे (वय-40) तिघे रा.साळवा ता. धरणगाव हे मालवाहू छोटा हत्ती गाडीत धान्य घेवून एरंडोल मार्गे औरंगाबादकडे जात असतांना सकाळी 9 ते 10 वाजेच्या सुमारास एरंडोल पासून अगदी हाकेच्या अंतरावर ओव्हरलोड झाल्याने मालवाहु गाडी कलंडली. गाडी कलंडल्याने तिघेजण पोत्यांच्या खाली दबले गेल्याने गंभीर दुखावत व जखमी झाले. तिघांना प्राथमोपचारासाठी जिल्हा सामन्य रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती अधिक गंभीर झाल्याने नातेवाईकांनी त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. याबाबत अद्यात पोलीसात कुठलीही नोंद नाही.