रावेर प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा, शिवसेना, रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ मलकापूर तालुक्यातील तालसवाडा, तांदुळवाडी, अनुराबाद, धरणगाव, कुंड खुर्द, कुंड बुद्रुक, निंबारी, दाताळा,शिराढोन, उमाळी, मलकापूर ग्रामीण येथे प्रचार रॅली काढून व कॉर्नर सभा घेऊन नवमतदारांशी संवाद साधला.
यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार चैनसुख संचेती, राहुल संचेती, रामभाऊ झांबरे, दादाराव पाटील, विलास पाटील, ज्ञानदेव वाघोदे, साहेबराव पाटील, माधवराव गावंडे, विजय साठे, अरुण अग्रवाल, अनिल झोपे, ए.के.पाटील, दिलीप नाफडे, हरिभाऊ देशमुख, शिवराज जाधव, संदीप लष्करे, अरविंद किनगे, स्वप्नील नाफडे, दिपक चौधरी, पांडुरंग नाफडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रोहिणीताई खडसे म्हणाल्या, गेल्या साडेचार वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगती करत आहे. नरेंद्र मोदीजी यांनी इतर मित्र राष्ट्रांसमवेत सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले. याचे चांगले परिणाम येत्या काही दिवसात आपल्याला बघायला मिळतील. याचबरोबर त्यांनी भारत देशाबरोबर गद्दारी करणाऱ्या शेजारील राष्ट्रांना धडा शिकवला व आम्ही जशास तसे उत्तर देऊ हे दाखवून दिले.
नाथाभाऊंनी तालुक्यासाठी विविध योजना आणल्या- रोहीणी खडसे-खेवलकर
देशाच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले. त्याचबरोबर भाजपा ध्येयानुसार अंत्योदयाचा विचार करून समाजातील शेवटच्या घटकांचा विकास व्हावा, यासाठी विविध योजना राबविल्या व देशाला प्रगतीपथावर नेले. एकनाथरावजी खडसे हे बुलडाणा जिल्हा पालकमंत्री असताना त्यांनी मलकापूर नांदुरा तालुक्यावर विशेष लक्ष दिले त्यांच्या व रक्षाताई यांच्या माध्यमातून खेडोपाडी समाज मंदिरे, सभागृह, काँक्रीट रोड, पेव्हर ब्लॉक, डांबरी रस्ते, गटारी बांधकाम, हायमस्ट लाईट, पाणीपुरवठा योजना अशा मुलभूत योजनासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला व खेडोपाडी कामे करून घेतली. विकासाचे हे चक्र असेच सुरू राहण्यासाठी रक्षाताई यांना निवडून द्या असे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.
भाजपा हा शेवट्या घटकापर्यंत विचार करणारा पक्ष – आमदार चैनसुख संचेती
यावेळी आमदार चैनसुख संचेती यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले भाजप हा समाजातील शेवटच्या घटकांचा विचार करून विकास करणारा पक्ष आहे येथे जात पात धर्म असा भेदभाव केल्या जात नाही म्हणून कोणत्याही भूलथापांना बळी न पडता भाजपाला मतदान करा यावेळी त्यांनी रक्षाताई खडसे यांना मलकापूर मतदारसंघातुन एक लाखाचे मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.