अवैध रेती वाहणाऱ्या ट्रकवर दोन दिवसांनी कारवाई सुरु

images 10

भुसावळ (प्रतिनिधी) येथील नाहाटा चौफुलीवर महसूल विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी पथक व पोलीस कर्मचारी यांनी दिनांक १६ एप्रिल रोजी रात्री नाकाबंदी पकडलेल्या ट्रकवर दोन दिवसांनंतरही कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरु आहे.

 

नाकाबंदी दरम्यान एका ट्रकमधून (क्र. एम.एच.१८ एम.४८१४) अवैध रेतीची वाहतूक होत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले होते. संबंधित ट्रक चालकास थांबवून कागदपत्रकांची विचारणा केली असता चालकाजवळ कुठलेही कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी पथकाचे सुदाम नागरे व पो.कॉ. ईश्वर भालेराव, पो.कॉ. अक्षय चव्हाण यांनी ट्रक ताब्यात घेवून तहसील कार्यालयात जमा केला होता. त्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी तहसीलदार महेंद्र पवार यांना ट्रक तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आल्याची माहिती रात्री १२:३० वाजेच्या सुमारास दिली होती. या ट्रकबाबत दिनांक १८ एप्रिल रोजी तहसील कार्यालयात सुदाम नागरे यांना विचारणा केली असता रेतीच्या पकडलेल्या ट्रकवर काहीही कारवाई करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर तहसीलदार महेंद्र पवार यांनी संबंधित तलाठी यांना गुन्हा दाखल करण्याबाबत सूचना दिल्या असून शहर पोलीस स्टेशनला तसे पत्र देण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content