मला आणखी बोलायला लावून नका ते सन्मानजनक नसेल; सरन्यायाधीशांनी बार असोसिएशनच्या अध्यक्षांना सुनावले

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सूप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि वरिष्ठ वकील अधीष अग्रवाल यांना सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बाँड संदर्भात फटकारलं आहे. अधीष अग्रवाल यांनी राष्ट्रपती द्रौपती मूर्म यांना सुप्रीम कोर्टाचा इलेक्टोरल बाँडसंदर्भात देण्यात आलेला निर्णय अयोग्य आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाला लागू न करण्याचा आदेश देण्यात यावा, अशा मागणीचे पत्र लिहले होते. त्यानंतर त्यांनी देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना देखील पत्र लिहिले होते.

त्यानंतर सुप्रीम कोर्टात इलेक्टोरल बाँडबाबतच्या सूनावणीवेळी सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाल की, तुम्ही आम्हाला इलेक्टोरल बाँडसंदर्भात घेतलेल्या निकालाचा पुनर्विचार करण्यास सांगत आहात. हे सर्व काही प्रसिद्धसाठी सुरु असल्याचं आम्हाला दिसत आहे. त्यामुळे यात लक्ष घालावे असं आम्हाला वाटत नाही. तुम्ही एक वरिष्ठ वकील आणि सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष आहात. तुम्ही पत्र लिहून माझ्या सू मोटोच्या अधिकारांना आव्हान दिले आहे. इलेक्टोरल बाँड हे सर्व प्रसिद्धीसाठी सुरु आहे. त्यामुळे आम्ही यात लक्ष घालणार नाही. मला आणखी काही बोलायला लावू नका. कारण, ते सन्मानजनक नसेल.

Protected Content