मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात पूर्ण बहुमताने पुन्हा भारतीय जनता पक्षाचेच सरकार येणार’, असे खळबळजनक वक्तव्य करत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होणार नसल्याचे संकेत दिले आहेत. गोरेगाव येथील नेस्को सभागृहात आयोजित सभेद्वारे शहा यांनी राज्यातील भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ केला.
या बरोबरच ‘देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील’, अशी घोषणा करत शहा यांनी पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. गोरेगाव येथील नेस्को सभागृहात आयोजित सभेद्वारे शहा यांनी राज्यातील भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्यावेळी त्यांनी कलम ३७० वर पक्ष आणि केंद्र सरकारची भूमिका मांडली. यावेळी बोलताना अमित शाह यांनी जम्मू काश्मीर, कलम ३७०व ३५ ए, पाकव्याप्त काश्मीर यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. अमित शाह म्हणाले, अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करणारा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतला. जम्मू काश्मीर खऱ्या अर्थाने भारताचे अंग झाले आहे. पण, शरद पवार आणि राहुल गांधी कलम ३७० व ३५ ए चा विरोध करत आहे. मला शरद पवार आणि राहुल गांधी यांना सांगायच की, जम्मू काश्मीर हा भाजपासाठी राजकीय मुद्दा नाही. हा देशाच्या हिताचा निर्णय आहे. त्यामुळे निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी ते कलम ३७० व ३५ ए विरोधातील आहेत की बाजूचे हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं,” असं शाह म्हणाले.