सार्वजनिक शौचालयाच्या कामात मोठा गैरव्यवहार – रिपाईतर्फे चौकशीची मागणी

यावल प्रतिनिधी । येथील तालुक्यातील पंचायत समितीच्या माध्यमातुन स्वच्छता अभियानाचा बट्याबोळ झाला. शासनाच्या मिळालेल्या अनुदानाचा मोठया प्रमाणावर दुरूपयोग करण्यात आल्याची तक्रार एका  निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यावल यांच्याकडे रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा जिल्हा कार्याध्यक्ष अशोक तायडे यांनी केली आहे. 

दिलेल्या निवेदनात म्हटल्यानुसार, संपुर्ण देशासह राज्यात स्वच्छता अभियानास यशस्वी करण्यासाठी शासनाच्या वतीने लाखो रुपयांची निधी गावपातळीवर सार्वजनिक शौचालय बांधणीसाठी मिळत असतात. मात्र तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात ही स्वच्छता योजना राबवितांना सर्व शासनाचे नियम धाब्यावर बसुन पंचायत समितीचे ग्राम विस्तार अधिकारी, ठेकेदार आणि शाखा अभियंता यांनी तालुक्यात विविध ग्रामपंचायतच्या परिसरासह गाव पातळीवर सार्वजनिक शौचालयांची थातुर-मातुर व अपुर्ण कामे करून ती कागदोपत्री पुर्ण दाखवुन पुर्ण बिले काढण्यात आली असल्याची तक्रारीत म्हटले आहे.

या योजनेची काही कामांची आदेश मिळण्याआदी काही अधिकारी यांनी आपल्या मर्जीतील मते दाखल करून कामे सुरू केली आहे. दरम्यान अशा कामांच्या मान्यता मिळवुन घेण्यासाठी शाखा अभियंतापासुन तर जिल्हा परिषदच्या वरिष्ठापर्यंत आर्थिक देवाण-घेवाण करून खोटी बिले तयार करीत असल्याचे म्हटले असुन यावल तालुक्यातीत मांगीकरंजी, लिघुरी, वढोदा, अट्रावल, भालोद, मायसांगवी, निमगाव, डोंगर कठोरा, हंबर्डी, बोरखेडा बु॥ आणी खुर्द चिखली बु॥, चिखली खु॥ , मनवेल,  बोरावल,टाकरखेडा थोरगव्हाण आणी चुंचाळे या ग्रामपंचायती मधील कार्यक्षेत्रात सार्वजनिक शौचालयाची कामे अपुर्ण अवस्थेत सोडलेली असुन , कामांची बिले मात्र ठेकेदारांनी काढुन घेतलेली. 

अशा प्रकारे शासनाच्या निधीचा गैरवापर करणाऱ्या ठेकेदाराकडुन बिले वसुल करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केली. यावल तालुक्यातील ग्राम पंचायत आणी ठेकेदार यांनी संगनमताने १४ व्या वित्त आयोगाच्या प्राप्त झालेल्या निधीचा देखील गैरवापर झालेला असुन, शासनाच्या निधीसह २०% ग्रामपंचायत निधी मध्येही बोगस बिले दाखवुन मोठया प्रमाणावर आर्थीक घोटाळे केलेले या सर्व भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करून संबंधीतांवर योग्य प्रकारे कारवाई करावी. अन्यथा कारवाई न झाल्यास रिपाईच्या माध्यमातुन तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा ही यावेळी देण्यात आला आहे. यावेळी रिपाईचे अशोक तायडे, जिल्हा रोजगार आघाडीचे युवराज सोनवणे, रिपाईचे युवा शाखा अध्यक्ष संजय तायडे, रिपाईचे तालुका उपाध्यक्ष भिमराव गजरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Protected Content