मैत्रेय गुंतवणूकदारांचे एक दिवसीय धरणे आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील मैत्रेय गुंतवणूकदारांना परतावा मिळून न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून गांधी उद्यानासमोर रविवारी २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मैत्रेय उपभोक्ता एवं अभिकर्ता असोसिएशनच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मैत्रेय कंपनीने २०१६ पासून ग्राहकांचा परतावा देणे बंद केले आहे. त्यामुळे भारतभरातील गुंतवणूकदार हवालदिल झाला आहे. तसेच गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे गुंतवणूकदार अजून जास्त आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. कंपनीतच्या संचालिका ह्या महिला असल्याने कंपनीत सर्वाधिक महिला ८० टक्के असून त्यांना देखील अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परतावा मिळत नसल्याने कंटाळून गुंतवणूकदार महिला व पुरुषांनी आत्महत्या देखील करून घेतलेले आहेत. या कंपनीत मोलमजुरी करणाऱ्यांपासून ते धुणंभांडी करणाऱ्या महिलां कष्टाचा पैसा या कंपनीत गुंतवलेला आहे. या कंपनीकडे दोन कोटी 16 लाख ग्राहकांचे एकूण २ हजार ६०० कोटी रुपये गुंतवणूक कंपनीत अडकले आहे.

ग्राहकांना न्याय मिळावा यासाठी मैत्रेय उपभोक्ता एवं अभिकर्ता असोसिएशनच्या वतीने रविवारी २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता गांधी उद्यान येथे अहिंसा मार्गाने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बाळू सोनवणे, दिलीप घुले, पांडुरंग महाजन, सुनंदा पाटील, अशोक पाटील, सर्जेराव पाटील, योगिता पाटील, जितेंद्र बारी, विमलबाई बारी, नामदेव बारी यांसह आदी गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content