आर्डरच्या नावाखाली तरूणीची फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यशवंत कॉलनीतील तरूणीला दिवाळी सणासाठी लागणाऱ्या वस्तूंची ऑर्डर देण्याच्या नावाखाली दोन जणांनी विश्वास संपादन करून २९ हजाराची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी १ ऑक्टोबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिशा अनिल अग्रवाल (वय-२९) रा. रिंगरोड, यशवंत कॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. त्या ऑनलाईन पध्दतीने व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. दिशा अग्रवाल यांनी ऑनलाईन पध्दतीने दिवाळी सणासाठी लागणाऱ्या वस्तू ऑर्डरनुसार मागितले होते. त्यानुसार २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत कोणत्याही वस्तू आल्या नाहीत. यासाठी साक्षी सिंग आणि पियुष जैन (दोघांचे पुर्ण नाव माहित नाही) रा. उदयपूर राजस्थान यांनी तरूणीचा विश्वास संपादन करून फोन पेच्या माध्यमातून २९ हजार रूपये घेवून फसवणूक केली आहे. तरूणीने शनिवारी १ ऑक्टोबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दुपारी २ वाजता साक्षी सिंग आणि पियुष जैन रा. उदयपूर राजस्थान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम वागळे करीत आहे.

Protected Content