जळगाव प्रतिनिधी । किरकोळ भांडणावरुन एका तरुणाने महिलेच्या घरी जाऊन दुचाकी फोडली. यानंतर महिलेचा विनयभंग केला. शनिवारी मध्यरात्री श्रावणनगरात ही घटना घडली असून याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
श्रावण नगरात राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग झाला आहे. सौरभ यशवंत चौधरी (वय २८, रा.दशरथनगर) याचे महिलेशी जुने किरकोळ भांडण होते. त्यातुन शनिवारी मध्यरात्री सौरभ महिलेच्या घरी गेला. त्याने महिलेची दुचाकी दगडाने फोडली. यानंतर घरात घुसून महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन सौरभच्या विरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक यशोदा कणसे तपास करीत आहेत.