पाच लाखांसाठी वाघनगर येथील माहेरवाशीणीला मारहाण करत छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । वाघ नगर येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी शिक्रापूर येथे पाच लाखांसाठी मारहाण करत छळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील वाघ नगरातील माहेर असलेल्या भाग्यश्री अमोल पाटील यांचा विवाह पुणे जिल्ह्यातील शीक्रापुर येथील अमोल धनराज पाटील यांच्यासोबत झाला आहे. घर घेण्यासाठी माहेरुन विवाहितेने पाच लाख रुपये आणावेत. यासाठी विवाहितेचा छळ केला जात होता. तसेच विवाहितेला शिवीगाळ करीत मारहाण देखील केली जात होती. हा छळ असह्य झाल्यानंतर विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यांनी सोमवारी २९ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजता रामानंद नगर पोलीसात तक्रार दिली. त्यावरुन विवाहितेचा पती अमोल धनराज पाटील, सासू रेखा धनराज पाटील दोघ रा. घागर मुंदाणे, ता. पारोळा, अमृता विनोद पाटील रा.नगांव गडखांब ता. अमळनेर, पुनम योगेश पाटील, योगेश युवराज पाटील दोघ रा. आंबा पिंप्री ता. पारोळा, दशरथ पाटील रा.जानवे ता. अमळनेर, ज्ञानेश्वर भिमराव पाटील रा.पुणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील हे करत आहे.

Protected Content