Home Cities जळगाव प्रभाग 13मध्ये महायुतीच्या प्रचारात उमेदवारांचा प्रत्यक्ष भेटीवर भर

प्रभाग 13मध्ये महायुतीच्या प्रचारात उमेदवारांचा प्रत्यक्ष भेटीवर भर

0
151


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 मध्ये महायुतीच्या उमेदवारांनी आज सकाळी आपल्या प्रचाराला औपचारिक सुरुवात केली. धार्मिक श्रद्धा आणि लोकसहभाग यांचा संगम साधत श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला.

महायुतीचे उमेदवार नितीन सपके, सुरेखा नितीन तायडे आणि प्रफुल्ल गुलाबराव देवकर यांनी सकाळच्या वेळी मंदिरात पूजा-अर्चा करून मतदारांच्या हितासाठी काम करण्याचा संकल्प केला. यानंतर त्यांनी आदर्श नगर, उज्वल इंग्लिश मीडियम स्कूल परिसर, लायन्स हॉल, क्रिश हाइट्स, बापूराव कॉलनीतील उत्कर्ष हाऊसिंग सोसायटी, स्वामी विवेकानंद सोसायटी तसेच रुस्तमजी स्कूल परिसरात प्रचार दौरा केला.

या प्रचारादरम्यान माजी नगरसेविका ज्योती चव्हाण यांनी सर्व उमेदवारांचे औपचारिक स्वागत केले. विविध भागांत नागरिकांनी आणि मतदारांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करत फटाक्यांची आतषबाजी केली. ‘महायुती जिंदाबाद’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला असून कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.

प्रचार फेरीदरम्यान उमेदवारांनी स्थानिक विकास, नागरी सुविधा, स्वच्छता, शिक्षण आणि पायाभूत सोयीसुविधांबाबत आपली भूमिका मांडली. नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Protected Content

Play sound