पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथे सर्व व्यापाऱ्यांनी कृषी कायदा बील विरोधात महाविकास आघाडीतर्फे कडकडीत बंदी करण्याचे आदेश देण्यात आले असून या बंदमध्ये सर्व व्यापारी प्रतिष्ठाने दुकाने सर्व बंद ठेवण्यात आले होते.
”देशाचा पोशिंदा जगला तर आम्ही जगु” दि. 26 नोव्हेंबर पासून देशाचा पोशिंदा दिल्लीच्या तक्तावर आपल्या न्याय्य हक्कासाठी लढा देत असून शेतकऱ्यांसाठी खोटा पुळका आणणाऱ्या मोदी सरकारने दखल घेतली नाही. शेतकरी विरोधात काळा कायदा निर्माण केला असून या विरोधात देशात किसान क्रांती शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. त्या आंदोलनात दिल्ली येथे आमचा शेतकरी बांधव थंडीत जुलमी सरकाराच्या थंड पाणी फवारा मारलेले पाणी जल तो अश्रूधूर सहन करीत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज पहूर येथे महाविकास आघाडी तर्फे बंद पुकारण्यात आला होता.
कडकडीत बंद झाला असून या बंदमध्ये महा विकास आघाडीचे शहर प्रमुख सुकलाल बारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष शैलेश पाटील, विभाग तथा पत्रकार गणेश पांढरे, वसीम शेख, इरफान शेख, उपसरपंच शाम सावळे, किरण पाटील रवींद्र पांढरे ,रमण शिरसागर ,आशिष माळी, सुधाकर शिंगारे, भाऊराव गोंधनखेडे, अशोक जाधव, विजय जाधव, सलीम शहा, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर बारी, राजू पाटील, अमोल पाटील, संतोष गोंधनखेडे यांच्यासह महा विकास आघाडीचे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.