महाविकास आघाडीचे गेट ऑफ इंडियाजवळ जोडे मोरो आंदोलन

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे प्रेरणास्थान पण आठ महिन्यांआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला पुतळा २६ सप्टेंबरला कोसळला अन् महाराष्ट्रभरात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. आज महाविकास आघाडीतर्फे मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन केले जात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात आंदोलन केले जात आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या नेतृत्वात मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन केले जात आहे.

मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत हा मोर्चा सुरू आहे. शरद पवार आणि छत्रपती शाहू महाराज हे काही वेळ मोर्चामध्ये चालले. त्यानंतर गाडीतून हे दोघे गेट वे ऑफ इंडियाकडे रवाना झाले आहेत. गेट वे ऑफ इंडिया परिसरात असणा-या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत मोर्चा संपेल. यावेळी महाविकास आघाडीचे नेते संबोधित करतील.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान त्यांचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही, असे म्हणत महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष केला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असे म्हणत शेकडो कार्यकर्ते गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाले आहेत.
आधी या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. मात्र आज रविवारचा दिवस आहे. या भागातील कार्यालयांना सुटी आहे. असे असताना आमच्या आंदोलनाला परवानगी का नाही? असा सवाल महाविकास आघाडीने केला. त्यानंतर हा मोर्चा अडवला जाणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. लावलेले बॅरिकेडस्ही हटवण्यात आले आहेत. हा मोर्चा आता गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाला आहे.

Protected Content