यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतच्या वतीने थोर समाजसुधारक सत्यशोधक समाजाचे जनक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती साजरी करण्यात आली.
कोरपावली तालुका यावल येथील ग्राम पंचायतच्या कार्यलयात थोर समाजसेवक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस कोरपावली ग्रामपंचायतीचे सरपंच विलास नारायण अडकमोल, माजी सरपंच जलील पटेल ,कोरपावलीचे सामाजीक कार्यकर्त मुक्तार पटेल , ग्राम पंचायत सदस्य सिकंदर तडवी आदींनी उपस्थित राहुन फुलेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी सरपंच विलास अडकमोल, मुक्तार पटेल,ग्राम पंचायत सदस्य सिकंदर तडवी,इंजिनिअर अविनाश अडकमोल, रोहित अडकमोल, सुखदेव इंधटे, नबाब तडवी, नागो तायडे, आकाश अडकमोल, ग्राम पंचायतचे कर्मचारी व ग्रामस्थांनी उपस्थित राहुन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना आदरांजली वाहीली.
याप्रसंगी माहीती देतांना सरपंच यांनी सांगीतले की कोरपावली ग्रामपंचायतच्या नविन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी राज्यातील महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातुन जिल्हा नियोजन समितीच्या वतीने २२ लाख बाविस लक्ष रुपयांचा निधी मंजुर करण्यात आल्याची माहीती देवुन, लवकरच या ईमारतीच्या कामास सुरुवात होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री ना . अजीत पवार , ग्रामविकायमंत्री ना . हसन मुश्रीफ , जिल्ह्याचे पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील , आमदार शिरीष चौधरी, आमदार सौ .लताताई सोनवणे या सर्वांचे आभार मानले.