रावेर (प्रतिनिधी) गोर गरीब जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाकडून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करून सेवा देणाऱ्या डॉक्टर मंडळी यांचे कौतुक श्रीराम पाटील यांनी केले.
विवरे येथे ग.गो.बेंडाळे महाविद्यालयात भुसावल येथील साईपुष्प हॉऊस्पिटलचे अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. निलेश महाजन आणि पुष्पा सर्जिकल हॉस्पिटलचे सर्जन डॉ. प्रसन्न जावळे यांनी रुग्ण तपासणीसाठी आपली उपस्थिती दिली. यावेळी प्रमुख पाहुणे श्रीराम फौंडेशन तथा उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीराम पाटील, अंबादास विवरेकर, अर्जुन सोळंके, श्री शिवनेरी गणेश मंडळ अध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
डॉ.निलेश महाजन यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, ग्रामीण भागातील नागरिकांना या योजनेचा लाभ होत असून दिलासा मिळत आहे. येत्या निवडणुकीत श्रीराम पाटील हे भाजपाचेउमेदवार असल्यास त्यांचा विजय नक्की असून विकासासाठी त्यांच्या दूरदृष्टीचा नक्कीच लाभ मतदार संघाला होईल.