जळगाव प्रतिनिधी । जळगाव शाखेची महाराष्ट्र साहित्य परिषदेची सर्वसाधारण ऑनलाईन सभेत आज जळगाव शाखेची नविन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात जिल्हाध्यक्षपदी प्रचार्य डॉ. शिरीष पाटील तर उपाध्यपदी प्रभात चौधरी व डॉ. अशोक कोळी यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र साहित्य परिषद जळगाव शाखेची सर्वसाधारण ऑनलाइन सभा मंगळवारी २७ एप्रिल रोजी डॉ. ए. पी. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राचार्य डॉ. किसन पाटील व प्रा. भास्कर पाटील यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागा आणि एकूण नवीन कार्यकारिणी निवडण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. याप्रसंगी दोन्ही मान्यवर साहित्यिक व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे क्रियाशील उपाध्यक्ष व कार्याध्यक्ष यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच महाराष्ट्रातील दिवंगत थोर साहित्यिक, समीक्षक, विचारवंत, कलावंत, प्राध्यापक, शिक्षकांनाही सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेचे डॉ. ए. पी. चौधरी यांनी कार्यकारिणी जाहीर केली; त्यात जिल्हाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपाध्यक्ष प्रभात चौधरी आणि डॉ. अशोक कौतिक कोळी, कार्याध्यक्षपदी प्रा. डॉ. सत्यजित साळवे, सहकार्याध्यक्ष नामदेव कोळी, कोषाध्यक्ष युवराज माळी, कार्यवाह डॉ. योगेश महाले, सहकार्यवाह प्रा. गोपींचद धनगर, सदस्यपदी माया दिलीप धुप्पड, शशिकांत हिंगोणेकर, संजीवकुमार सोनवणे, विजय लुल्हे, मोरेश्वर सोनार अशी तेरा जणांची निवड केली. या निवडीला उपस्थित सभासदांनी टाळ्या वाजवून मान्यता दिली. सभेला प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, प्राचार्य डॉ. वासुदेव वले, डॉ. सुनील मायी, डॉ. रवींद्र बावणे, डॉ. चंद्रमणी लभाणे यांच्यासह अनेक आजीव सभासद उपस्थित होते.