महाराष्ट्र दिनाचा उत्साह; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते गुणवंत अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान!

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात आज १ मे रोजी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि संस्थांचा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटुळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

समारंभात, पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीसाठी शामकांत पाटील, प्रविण ढाके, जितेंद्र पाटील, गोरखनाथ बागुल, विनोद पाटील, रमेश कुमावत, दिलीप कुलकर्णी, हरिष कोळी, आशिष चौधरी, सचितानंद अहिरे आणि महिला पोलीस शिपाई जागृती काळे या अधिकारी व अंमलदारांना ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह 2025’ प्रदान करण्यात आले.

महसूल विभागात उत्कृष्ट कार्य करणारे तलाठी रुपेश अनिल ठाकूर यांना ‘आदर्श महसूल अधिकारी पुरस्कार (2024-25)’ देऊन गौरवण्यात आले.

यासोबतच, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जिल्ह्यातील युवा पिढीचाही सन्मान करण्यात आला. ‘जिल्हा युवा पुरस्कार’ जिनल जितेंद्र जैन, मोनाली रामलाल कुमावत, तेजस धनंजय पाटील, अनिल शिवाजी बाविस्कर, शुभांगी विठ्ठल फासे आणि सागर सुखदेव कोळी यांना प्रदान करण्यात आले. तसेच, ‘जिल्हा युवा पुरस्कार – संस्थात्मक विभागात’ दर्जी बहुउद्देशीय संस्था, साने गुरुजी फाउंडेशन, निःस्वार्थ जनसेवा फाउंडेशन आणि पवन चॅरिटेबल ट्रस्ट यांचा गौरव करण्यात आला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना, राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक निष्ठेने आणि तत्परतेने काम करून राज्याच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन केले. जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनीही पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Protected Content