यावल प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज पुकारलेल्या बंदला यावल शहरातील दुकानदार व व्यापाऱ्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. आज सोमवार ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.
उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी या गावातील शेतकऱ्यांना केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्र्याच्या गाडीखाली चिरडून र्निदयीपणे ठार केल्याचा प्रकार अत्यंत निंदनीय व तीव्र चीड आणणारा आहे. यात शेतकरी आंदोलन करतांना एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने त्यांच्या वाहनाखाली शेतकऱ्याला चिरडल्याचा प्रकार झाला. याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने बंद पुकारले आहे. या अनुषंगाने आज सोमवारी ११ ऑक्टोबर रोजी यावल शहरात महाविकास आघाडीचे तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी रस्त्यावर उतरून दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. या बंद आवाहनाला शहरातून समिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, कॉग्रेसचे तालुकाध्या प्रभाकर सोनवणे, शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र सोनवणे, पंचायत समिती गटनेते शेखर पाटील, कृउबा माजी संचालक दिनकर पाटील, ॲड. देवकांत पाटील, बोदडे नाना, हितेश गजरे, राहुल चौधरी, भैय्या पाटील, अॅड. निवृत्ती पाटील, निवृत्ती धांडे, अय्युब रवान, नानासिंग बारेला, प्रमोद पाटील, डॉ. हेमंत येवले, गनी भाई, कामराज घारू, व्दारका पाटील, श्यामलाल भावसार, नरेंद्र शिंदे, अहमद करीम मन्यार, भगतसिंग पाटील , कदीर खान, हाजी गफ्फार शाह, अनिल जंजाळे, नईम शेख, विवेक सोनार, बशीर तडवी, विनोद पाटील, अमोल भिरूड, चंद्रकला इंगळे, पुंडलीक बारी, हाजी अय्याज खान, सद्दाम शाह, सेनेचे शहरमुख जगदीश कवडीवाले, सुनिल बारी, माजी तालुकाप्रमुख कडु पाटील, संतोष खर्चे, पप्पु जोशी, अजहर खाटीक, नगरसेवक शेख अस्लम शेख नबी, नगरसेवक समीर शेख व सैय्यद युनुस सैय्यद यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.