महाराजांची वाघनखे १९ जुलैला साताऱ्यात येणार; मंत्री मुनगंटीवारांनी दिली माहिती

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | १९ जुलैला छत्रपती शिवरायांची वाघनखे साताऱ्याच्या सरकारी म्युझियममध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व तिथले सरदार यांच्या उपस्थितीत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे अशी घोषणा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणली जाणार असल्याचे आता राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी केलेल्या दाव्यावर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मुनगंटीवार यांनी हे निवेदन दिले आहे.

यावेळी बोलतांना ते म्हणाले, ”नेक शिवभक्तांची मागणी होती की अफजलखानाच्या कबरीजवळचे अतिक्रमण हटवावे. 5 नोव्हेंबर 2022 रोजी या दिवशी ते हटवण्याचा निर्णय झाला. 10 नोव्हेंबर रोजी ते अतिक्रमण हटवले. त्यानंतर शिवभक्तांनी वाघनखांची माहिती दिली. आपण त्यासंदर्भातला पत्रव्यवहार सुरू केला. ती वाघनघं शिवभक्तांच्या दर्शनासाठी द्यावीत असा पत्रव्यवहार पंतप्रधान नरेंद्र मोदी, ब्रिटनचे पंतप्रधान आणि त्या संग्रहालयाच्या प्रमुखांशी केला. त्यांचे उत्तर आले. 1825 रोजी बनवलेल्या डबीत ही वाघनखं ठेवली आहेत. त्या चित्रासह त्यांनी सर्व माहिती पाठवली”, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

Protected Content