महापालिकेकडून आडोसा उभारण्यास परवानगी

jalgaon 1

जळगाव प्रतिनिधी । कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील दुकानदारांच्या मालाचे संरक्षणासाठी आडोसा व पत्र्याचे अँगल तात्पुरते उभारण्यासाठी महापालिकेने परवानगी देण्यात यावी अशी मागणी सभापती कैलास चौधरी यांनी केली आहे.

याबाबत माहिती अशी की, जागेपलीकडील दुकानदारांच्या मालाच्या संरक्षणासाठी आडोसा  उभारणे आवश्यक असल्याने कुंपण उभारणेस महापालिकेकडून
परवानगी मिळाली आहे. महापालिकेकडून महामार्गाच्या हद्दीवर परवानगी न देता ९.०० मीटर रूंदीचा समांतर रस्ता सोडून पण उभारणेस परवानगी दिली आहे. कुंपणास महापालिका कडून परवानगी दिली असून ही 6 महिन्याकरिता राहणार आहे. व्यापारी संकुलाचे विकासक पराग कन्स्ट्रक्शन यांना देखील त्वरीत कुंपन उभारणेकरीता आदेशीत करण्यात आले आहे. त्यांनी काम सुरू केले आहे. दरम्यान अतिक्रमीत भिंत पाडल्यापासून बाजार समितीतील मालाच्या रक्षणार्थ
सुरक्षा रक्षक नेमलेले असून येत्या आठ दिवसात कुंपण बांधून पूर्ण होईल अशी अपेक्षा सभापती कैलास चौधरी यांनी केली आहे.

Protected Content