सामूहिक विठ्ठल नामजप महोत्सवानिमित्त ‘महाकाय रांगोळी’

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सामूहिक विठ्ठल नाम जप व नाम संकीर्तन फैजपूर येथे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती च्या वतीने सप्ताह निमित्ताने भव्य दिव्य रांगोळी काढण्यात आली.

व्यासपीठ व स्थापना येथे फुल सजावटचे नियोजन करण्यात आले. सदर रांगोळी साठी चित्रकार कला शिक्षक राजू साळी, खिलेश दालवाले, सौरभ कोळी, साक्षी पाटील, हेमांगी चौधरी,मंजू पाटील,धारेश बोरोले, लक्ष्मण साळी तसेच परदेशी महिला मंडळ या सर्वानी अथांग प्रयत्न केले. या महाकाय रांगोळी साठी 80 किलो रांगोळी, १ क्विंटल फुलांच्या पाकळ्या, 30 किलो लाकडाचा भुसा वापरण्यात आला. एकूण 3 रांगोळी काढण्यात आल्यात, तिघ ही रांगोळी या 30 × 30 च्या आहेत, सदर तिघ रांगोळीस 10 तास एवढा कालावधी लागला,व्यासपीठ व स्थापना येथे फुल सजावट चे नियोजन रात्री करण्यात आले.

रांगोळी सम्पन्न झाल्या नंतर कला शिक्षक राजू साळी आणि ग्रुप यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी राजू साळी यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले कि, आदरणीय दादा साहेब ह.भ.प. नरेंद्र भाऊ नारखेडे यांच्या सकल्पनेतून भव्य दिव्य नामजप सोहळा असून यासाठी आमच्या ग्रुपने महाकाय रांगोळी चे आयोजन केलेले असून आजवर फैजपूर शहरात झालेल्या धार्मिक कार्यक्रम व इतर कार्यक्रमांमध्ये अशा महाकाय रांगोळीचे आयोजन झालेले नव्हते. परंतु या समितीच्या वतीने आम्हा कलावन्ताना व कलेला वाव देण्यात आला म्हणून आम्ही भव्य दिव्य रांगोळी काढण्याची संधी मिळाली, आणि ही संधी ऐतिहासिक फैजपूर शहरासं ती एक परवणी ठरत आहे. यावर साक्षी पाटील यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले कि, रांगोळी ही एक कला संस्कृतीचे प्रदर्शन असून ती लक्ष्मी व समृद्धीचे प्रतीक असते त्यानंतर संपूर्ण टीमने आयोजक समिती चे आभार मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content