महाजनादेश ही संवादाची यात्रा- मुख्यमंत्री ( व्हिडीओ )

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाची यात्रेची परंपरा असून महाजनादेश ही संवादाची यात्रा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे ईव्हीएमला दोष देतात. परंतु ते देखील याच इव्हीएमद्वारे जिंकले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिपादन केले. ते सागर पार्क येथे आयोजित महाजानादेश यात्रेत बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे, आ. एकनाथराव खडसे, आ. राजूमामा भोळे, हरिभाऊ जावळे, स्मिता वाघ, महापौर सीमा भोळे, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, उपमहापौर डॉ. अश्‍विन सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडे १५ वर्ष सत्ता होती. त्यांच्यात सत्तेची मुजोरी वाढीला लागली असल्याने त्यांचा पराभाव झाला. आ. राजूमामा भोळे यांनी त्यांना देलेला निधी खर्च केल्यानंतर पुन्हा शहर विकासासाठी निधी देण्याचे आश्‍वासन दिले. मी विरोधकांच्या ४० जागा येतील असे म्हणालो होतो परंतू त्यांना ४० काय ३० जागा देखील मिळू देणार नाही असे आव्हान ना. गिरीश महाजन यांनी केले. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांनी भरभरून मतदान केले याची आठवण ना. महाजन यांनी सांगितली. आ. राजूमामा भोळे यांना तुम्ही टेन्शन घेऊ नका ज्याला जितके पाहिजे त्याला तेवढेच मिळते असा उपरोधिक सल्लादेखील ना. गिरीश महाजन यांनी दिला. जिल्ह्यात राष्ट्रवादीला खाते देखील उघडू देणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. जिल्ह्यात रस्त्यांची कामे चौफेर चालू असून वर्षभरात जेडीसीसी, हुडको यांच्या कर्जातून मुक्त करून दाखविले असेही त्यांनी स्पष्ट केले.तर ना. महाजन पुढे म्हणाले की, गावा-गावात नागरिक यात्रेचे स्वागत करत आहेत. वसंतराव नाईक यांच्या नंतर देवेंद्र फडणवीस हे दुसरे मुख्यमंत्री आहेत ज्यांनी ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला असल्याचे गौरदगार काढले. आ. राजूमामा भोळे यांनी वर्षाभरात मोठ्या प्रमाणावर निधी देऊन शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकल्याचे सांगितले. गाळेधारकांचा प्रश्‍न उपस्थित करत आ. भोळे यांनी त्याचा ४ पट दंड कमी करत ८ टक्के रेडीरेकनरचा दर कमी करून तो ३ ते ४ टक्के करावा अशी मागणी केली.

आ.राजूमामा भोळे यांनी सांगितिले की, गेल्या पाच वर्षात ९०० कोटींचा निधी आणला असून यात पंतप्रधान नरेद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी पालकमंत्री एकनाथराव खडसे, चंद्रकांत पाटील, विद्यमान पालकमंत्री गिरीश महाजन यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे आ. भोळे यांनी सांगितले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर याआधी निधी मिळाला नव्हता. तो मिळाल्याने ऋणात राहू इच्छितो असे सांगितले. याप्रसंगी ग्राहकदृष्टी आरोग्य साधना व जी. एम. फाऊंडेशनतर्फे उत्कृष्ट कार्य करणार्‍या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. यात डॉ. भास्कर खैरे, डॉ. प्रदीप जोशी, डॉ. धर्मद्र पाटील, डॉ. हेमंत पाटील, डॉ. राहुल महाजन, डॉ. अनिल खडके आदीचा समावेश होता. दरम्यान, राष्ट्रवादी शहर अध्यक्षा नीला चौधरी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/463225707859812

Protected Content