रावेर, प्रतिनिधी | येथील कृषी उपन्न बाजार समितीच्या सभापतिपदी भाजपाचे श्रीकांत महाजन तर उपसभापतिपदी काँग्रेसचे उस्मान तडवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सभापती डी.सी. पाटील, उपसभापती कैलास सरोदे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदांवर आज ही निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.एम. गायकवाड यांनी काम पाहिले तर त्यांना सहकार्य गोपाळ महाजन यांनी केले.
यावेळी बाजार समिती संचालक दिलीप पाटील, कैलास सरोदे, डॉ. राजेंद्र पाटील, राजीव पाटील, गोपाल नेमाडे, निळकंठ चौधरी, गोंडू महाजन, विनोद पाटील, सौ.प्रमिला पाटील, सौ.कल्पना पाटील, पितांबर पाटील, प्रमोद धनके, अरूण पाटील, पंकज येवले, योगेश पाटील, सै.असगर सै. तुकडू, अर्जुन महाजन आदी उपस्थिती होते. यावेळी निवडीची घोषणा होताच कार्यकत्यानी ढोल-ताशे वाजवूत एकच जल्लोष केला.