जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मूळजी जेठा महाविद्यालयातील स्टाफ अकॅडमीतर्फे सेवानिवृत्त होणाऱ्या तीन प्राध्यापकांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तिघांच्या प्रेरणादायी सेवाकार्याची माहिती अन्य प्राध्यापकांनी दिली.
महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.जयश्री महाजन, राज्यशास्त्र विभागाचे माजी प्रमुख प्रा.संजय हिंगोणेकर आणि भौतिकशास्त्र विभाग प्रमुख व पदार्थ विज्ञान प्रशाळा संचालक प्रा. डॉ.के.बी.महाजन सेवानिवृत्त झाले. यानिमित्त त्यांना निरोप देण्यात आला. त्यांच्या सेवाकार्याचा गौरव प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे यांनी केला. डॉ. प्रतिभा निकम, डॉ. जयेश पाडवी, डॉ.विद्या पाटील, डॉ. सागर बडगे, डॉ.प्रेमजीत जाधव, राजेश बागुल यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.कविता पाटील यांनी केले. यशस्वितेसाठी स्टाफ अकॅडमी समिती प्रमुख प्रा. डॉ.पूजा पांडेय व सदस्यांनी परिश्रम घेतले.