जळगाव प्रतिनिधी । के.सी.ई. सोसायटीच्या मदर टेरेसा हेल्थ केअर सेंटर, मु.जे. महाविद्यालय व आरोग्य सेवा मेडीकल फाउंडेशन संचालित रेड प्लस ब्लड बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने मु.जे. महाविद्यालयातील मुलींच्या होस्टेलच्या सर्व विद्यार्थीनींसाठी रक्तगट व रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण चेक करण्यासाठी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी रेड प्लस ब्लड बॅंकेचे ट्रेझरर व एच.ओ.डी. सुरज पाटील, जनसंपर्क अधिकारी अख्तर आली सैय्यद व त्यांची सहकारी टीम आलेली होती. स्त्रियांमध्ये विशेषतः भारतीय स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण नेहमीच कमी आढळून आलेले आहे. त्यामुळे स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीने यामध्ये त्यांनी विद्यार्थीनींना हिमोग्लोबीनचे प्रमाण उत्तम राखणे किती गरजेचे आहे ते पटवून दिले. रक्तगट तपासणी करतांना रक्तदानाचे महत्व सांगून रक्तदान करण्यासाठी ही प्रवृत्त केले. या शिबिराचा सुमारे ३०० विद्यार्थीनींनी लाभ घेतला. या कार्यक्रमाप्रसंगी के.सी.ई. सोसायटी संचालित मु.जे.महाविद्यालयातील मुलींचे होस्टेल चे रेक्टर संजीव पाटील उपस्थित होते.
मदर टेरेसा हेल्थ केअर सेंटरच्या मेडीकल ऑफिसर डॉ.लीना चौधरी यांनी या कार्यक्रमासाठी आवश्यक ती वैद्यकीय सेवा दिली. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रेड प्लस ब्लड बॅंकेचे चेअरमन डॉ. मोईस देशपांडे यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुलींच्या होस्टेल च्या विद्यार्थीनी, कार्यकारी व सागर गुरव यांचे सहकार्य लाभले.