यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यात मागील काही दिवसापासुन गुरांवर लंपी स्किन डिसिज या संसर्ग आजाराचा प्रादुर्भाव सर्वत्र मोठया प्रमाणावर पसरत आहे. या संदर्भात माहीती घेण्यासाठी जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन यांनी यावल येथे भेट देवून सद्यस्थितीची माहिती पथुधन अधिकारी यांच्याकडुन जाणुन घेतली.
यावल तालुक्यात गेल्या काही दिवसापासुन गुरांवर लंपी स्किन डिसिज या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर वाढला आहे. यामुळे पशुपालकांची गुरढोर ही मोठया प्रमाणावर दगावली गेली आहेत. या पार्श्वभुमीवर जळगाव जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन यांनी आज यावल तालुक्यात लंपी संदर्भात माहीती मिळवुन घेण्यासाठी यावल पंचायत समिती व यावल येथील पशु चिकीत्सालयास भेट दिली .
याप्रसंगी प्रस्तुत प्रातिनिधी यांनी त्यांची भेट घेवुन या आजाराबाबत समज गैरसमज विषयी त्यांना विचारले असता अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मोहन यांनी सांगितते की, लंपी स्किन डिसीज हा गुरांवरील आजार जरी धोकादायक व संसर्गजन्य असला तरी मानवजातीवर त्याचा कुठलाही परिणाम होत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. तसेच दुग्धप्राण्यांच्या दुधाबाबत पसरलेल्या अफवांच्या माध्यमातुन होत असलेल्या गैरसमज बाबतही त्यांनी माहीती दिली.
लंपी या गुरांच्या आजारा संदर्भात विविध प्रकारचे गैरसमज भितीयुक्त अफवामुळे पसरत असुन, विशेष करून ग्रामीण क्षेत्रातील नागरीक हे गुरांवरील आजाराच्या भितीमुळे विना दुधाची चहा घेत असल्याचे वृत आहे. या पार्श्वभुमीवर मोहन यांच्याशी विचारणा केल्यावर त्यांनी सांगीतले , लंपी आजाराचा दुधाळ प्राणांच्या दुधावर कुठलेली परिणाम होत नसल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले. यामुळे आपण ग्रामपंचायत पातळीवर ग्रामसेवक यांच्या माध्यमातुन जनजागृती करण्याबाबत सुचना देणार असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी .एम .मोहन यांनी सांगितले. याप्रसंगी यावलचे पशुधन अधिकारी आर. सी. भगुरे, ग्रामसेवक संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष रूबाब तडवी आदी उपस्थित होते.