यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील दहिगाव, मोहराळा, वड्री परसाडे सह परिसरात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने गहु पिकांचे नुकसान झाल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यावल तालुक्यातील दहिगाव,मोहराळा, वड्री, परसाडे, हिंगोणा, डोंगर कठोरा, बोरखेडा या सह ईतर परिसरात २७ सोमवार रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यारा सह पाऊस झाल्याने कापणीला आलेला गहु पीक उनमलून पडले आहे त्याच बरोबर हरभरा पिकांचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे आलेल्या या बेमौसमी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे.
आडवा पडलेला गव्हाच्या पिकांमुळे यंदा उत्पन्न कमी येण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. या आधीच गहु पिकांवर आलेला अळीचा प्रादुर्भाव पडल्याने गहू उत्पन्न घटणारच ही भीती निर्माण झालेली असतांना त्यातच निसर्गाच्या अवकाळी पावसाने दिलेला हा फटका यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी चिंता दूर झालेले आहेत अशा पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.