Home Cities धरणगाव गुड शेफर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

गुड शेफर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

0
37

school

 

धरणगाव प्रतिनिधी । येथील गुड शेफर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये आज दि. 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुरवातीला लोकमान्यांच्या प्रतिमेला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांनी पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर शाळेतील शिक्षिका शिरीन खाटीक यांनी लोकमान्य टिळकांच्या कार्याविषयी माहिती दिली. स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी दिलेले योगदान, त्यांची जहाल व परखड भूमिका, स्वराज्य मिळविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. ‘जो धर्म माणसा माणसात भेद करतो, त्याला मी धर्म मानत नाही’ या लोकमान्यांच्या भूमिकेवर त्यांनी प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे समाजासाठी, देशासाठी झटलो पाहिजे हीच प्रेरणा आपण महापुरुषांच्या जीवनातून घेतली पाहिजे असे ही खाटीक मॅम यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी आदी उपस्थितीत होते.


Protected Content

Play sound