लंडन वृत्तसंस्था । कोरोनाच्या नवीन प्रकाराचा प्रतिकार करण्यासाठी ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा सक्तीचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे.
इंग्लंडमध्ये पुन्हा एखदा लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केली आहे. कोरोनाच्या नव्या प्रकाराने इंग्लंडमध्ये थैमान घातलं आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. जॉन्सन यांनी देशवासियांना संबोधित केलं. त्यावेळी हा लॉकडाऊन बुधवारपासून लागू होईल अशी घोषणा केली आहे.
कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराने इंग्लंडमध्ये थैमान घातलं आहे. त्यामुळे इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी ही घोषणा केली आहे. स्कॉटलंडने लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर जॉन्सन यांनीही संपूर्ण इंग्लंडमध्ये लॉकडाऊनची घोषणा केलीय. बुधवारपासून हा लॉकडाऊन लागू होणार आहे. त्यामुळे बुधवारपासून इंग्लंडमधील सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
इंग्लंडमध्ये आता लागू करण्यात आलेला लॉकडाऊन हा गेल्यावर्षी मार्च ते जून दरम्यान लावण्यात आलेल्या लॉकडाऊनप्रमाणेच असेल. अत्यंत गरजेच्या कामासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे.