नवीदिल्ली – येत्या २५ सप्टेंबर महिन्यापासून देशभरात पुन्हा लॉकडाऊन करण्यात यावे असा प्रस्ताव दिल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तथापि, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने हे वृत्त खाडून काढताना ही फेक न्यूज असल्याचे सांगितले.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने २५ सप्टेंबरपासून देशात पुन्हा लॉकडाऊन करण्याची शिफारस केल्याचे वृत्त सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. या स्क्रीन शॉटमधील पत्रकात तसे आदेश संबंधित प्रशासनाने दिले असल्याचे सांगण्यात येत होते. तथापि, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने हे वृत्त खाडून काढताना ही फेक न्यूज असल्याचे सांगितले.
पीआयबीने ट्विट केले की ‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने २५ सप्टेंबरपासून पुन्हा देशभर लॉकडाऊन होणार या संदर्भात काढलेल्या आदेशाबाबत पीआयबीने तथ्य तपासले, हा आदेश फेक आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पुन्हा लॉकडाऊनचा असा कोणताही आदेश काढलेला नाही.’