केळी ग्रुप व्यापाऱ्यांकडुन खोटे धनादेश देवुन फसवणुक

 

यावल प्रतिनिधी – येथील केळी उत्पादक शेतकऱ्यास केळी व्यापाऱ्याकडुन आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून व्यापाऱ्यांवर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात यावल पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या सुत्रानुसार यावल येथील राहणारे केळी उत्पादक शेतकरी व वैद्यकीय व्यवसायीक डॉ गणेश लक्ष्मण रावते (वय६१ वर्ष ) यांनी दिलेल्या आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की रावेर तालुक्यातील पुनखेडा येथील राहणारे व दत्तगुरू केला ग्रुपचे मालक सुभाष कांतीलाल पाटील (हल्ली मुकाम भगवती नगर जुना सावदा) व यावल तालुक्यातील सांगवी येथील राहणारे गणेश केला ग्रुपचे मालक रवीन्द्र ओंकार सपकाळे या दोघांनी मिळुन आपल्या माझ्या यावल तालुक्यातीत टाकरखेडा गाव शिवारातील शेत गट क्रमांक२४ मधील शेतात केळी पिक ही साधारण एक वर्षापुर्वी २०१९मध्ये लावलेली केळी पिक लागवडीचे पिकपुर्ण झालेली केळी किमत सुमारे ३ लाख५७ हजार रूपये किमतीची केळी विश्वास संपादन करून तोड केली.

मात्र या व्यवहारातुन ३५ हजार रूपये वगळता त्यांनी दिलेली ३ लाखाहुन अधिक रुपयांचे धनादेश हे बाऊन्स झाले त्पा नंतर ही मी त्यांना वेळोवेळी कापलेल्या केळी पिक पैश्यांची मागणी केली असता आपणास उडवाउडवीची उतरे मिळत असल्याचे निदर्शनास आल्याने या दोघा केला ग्रुपच्या व्यापाऱ्यांकडुन आपली आर्थिक फसवणुक झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले असुन , यावल पोलिस स्टेशनमध्ये डॉ गणेश लक्ष्मण रावते यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी सुभाष कांतीलाल पाटील आणी रवीन्द्र ओंकार सपकाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असुन तपासपोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर हे करीत आहे .

Protected Content