जळगाव प्रतिनिधी । शहरातील लहान व्यावसाय करणाऱ्या दुकानदारांना बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत कर्ज वाटप करण्यात आले.
सविस्तर माहिती अशी की, कोरोना काळात लहान व्यवसायिकांना मोठा आर्थीक फटका बसला आहे. लहान मोठे रस्त्यावरील व्यवसाय बंद पडल्याने आर्थीक परिस्थिती खालावली आहे. या अनुषंगाने दुकानदारांना मदत देण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने पी.एम. स्वनिधी योजना सुरू केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, जळगाव अंचलतर्फे जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात चहावाले, फळ विक्रेते, पोस्टर विक्रेते, नारळ पाणी विक्रेते अशा रस्त्यावरील लहान व्यवसाय करण्याऱ्यांनी पी.एम. स्वनिधी योजनेंतर्गत कर्ज देण्यात आले. या योजनेच्या अंतर्गत जळगाव शहरात स्त्यावरच्या लहान दुकानदारांना कर्ज वाटप व दिवाळी निमित्ताने मिठाई वितरण बँक ऑफ महाराष्ट्राच्या अंचल प्रबंधक श्रीमती रश्मीरेखा पती ह्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वरील कार्यक्रमास मुख्य प्रबंधक मायाराम, निर्मल कुमार तसेच बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सोबत धुळे आणि नंदुरबार शहरात सुद्धा हा कार्यक्रम राबविण्यात आला.