Home Cities भुसावळ वरणगाव येथे पशूधनाची चोरी; पोलीसात गुन्हा दाखल

वरणगाव येथे पशूधनाची चोरी; पोलीसात गुन्हा दाखल

0
100

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील वरणगाव येथील शेतकऱ्याच्या ६० हजार रूपये किंमतीच्या दोन म्हशींची चोरी केल्याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू आनंद बाउस्कर (वय-४५) रा. राऊजी बुआ नगर, वरणगाव हे शेतकरी असून म्हशी व्यवसायातून आपला कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. त्याच भागात गुरांसाठी त्यांचा वाडा असून त्याठिकाणी ६० हजार रूपये किंमतीच्या दोन म्हशी बांधतात. १ जून रोजी रात्री ११ वाजता नियमित पणे  बाउस्कर यांनी म्हशींना चारापाणी केले व झोपले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन्ही म्हशीची चोरी केली. हा प्रकार २ जून रोजी सकाळी ५ वाजता उघडकीला आला. परिसरात शोध घेतला परंतू म्हशी कुठेच आढळल्या नाहीत. राजू बाउस्कर यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नागेंद्र तायडे करीत आहे. 

 


Protected Content

Play sound