लाईव्ह ट्रेन्डस् न्युज इफेक्ट : चैतन्य तांडा येथील डी.पी. दुरूस्तीच्या कामाला सुरूवात

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चैतन्य तांडा इलेक्ट्रिक डीपी गेल्या आठ दिवसांपासून नादुरूस्त होती. यासंदर्भात लाईव्ह ट्रेन्डस न्यूजने बातमी प्रकाशीत केली होती. या बातमीमुळे जाग आलेल्या महावितरणने आज दुरूस्तीच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात केली आहे.

तालुक्यातील चैतन्य तांडा क्रमांक ४ येथे गेल्या आठ महिन्यांपासून  डी.पी. नादुरूस्त होती. त्यातच डीपीमध्ये ईलेक्ट्रिक वायन एकमेकांना स्पर्श होत असल्याचे अनेक वेळा अपप्रकार होत आहे. सुदैवाने त्यात कोणालाही इजा पोहचली नाही. ही गंभीर स्वरूपाची माहिती करगाव विकासोचे चेअरमन दिनकर राठोड यांनी कार्यकारी अभियंता हर्षवर्धन जगताप यांना वेळोवेळी निदर्शनास आणून दिले होते. तरी देखील महावितरण कंपनीकडून कोणतीही अंमलबजावणी होत नाही. या कारभारामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत असून संताप व्यक्त होत होता. या संदर्भात लाईव्ह ट्रेडन्स न्यूजने “चैतन्य तांडा येथील उघड्या डी.पी.मुळे अपघाताला आमंत्रण; दुरूस्तीची मागणी” या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. या बातमीमुळे महावितरण कंपनीला खळबळून जाग आली असून अवघ्या चार तासात दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली.  

Protected Content