शेंदूर्णी प्रतिनिधी । समाज मध्यम व प्रसार माध्यमातून होणाऱ्या टिकेनंतर शेंदूर्णी नगरपंचायत मधील मॅनेज टेंडर पद्धतीचा भांडाफोड होत असल्याचे लक्षात आल्याने शेंदूर्णी नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी प्रिबीड पध्दत बंद केली आहे.
सत्ताधारी मंडळींच्या मर्जीतील ठेकेदारांनाच निविदा मिळवी म्हणून शेंदूर्णी नगरपंचायत मध्ये बेकायदेशीर प्रिबीड मीटिंग पद्धती लावण्यात येत होती व मर्जीतील ठेकेदारांच्या नावावर सत्ताधारी कामे करत होते म्हणून मुख्याधिकार्यावर दबाव टाकून प्रिबीड मिटिंग सक्तीचा आग्रह सत्ताधारी मंडळी कडून धरण्यात येत होता प्रिबीडचा बेकायदेशीर आधार घेऊन मॅनेज टेंडर पध्दतीने मर्जीतील ठेकेदारांच्या याआधी ४ कोटी रुपयांच्या ३७ निविदा मंजूर करण्यात आल्या त्यातील पूर्ण झालेल्या कामांची १.७५ कोटी रुपयांची बिले अदा करण्यात अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवून कामांचा दर्जाची प्रत्यक्ष पाहणी न करता बिले अदा केली आहेत