LIVE : प. बंगाल भाजप रॅलीत हिंसा ; अमित शहा यांची पत्रकार परिषद सुरु

https://www.facebook.com/BJP4India/videos/2196539767082321/

 

कोलकत्ता (वृत्तसंस्था) कोलकात्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोला हिंसक वळण लागल्याने राजकीयदृष्ट्या वातावरण तापले आहे. शहा यांचा कोलकतामध्ये रोड शो सुरू होता. तेव्हा त्यांच्या ट्रकवर एकाने काठी भिरकावल्यानंतर दोन गटांमध्ये दगडफेक सुरू झाली. तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झाल्याचे वृत्त होते. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता.

 

लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवरुन निवडणुकीला गालबोट लागलं आहे. भारतीय जनता पार्टी आणि तृणमूल काँग्रेस यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पश्चिम बंगालमधील राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकाता येथील रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचाराविरोधात भाजपाने निवडणूक आयोगाची भेट घेऊन टीएमसीवर कारवाईची मागणी केली. तसेच आज नवी दिल्ली येथील जंतरमंतर येथे धरणे आंदोलन करणार आहे.

 

amit shah

 

Add Comment

Protected Content