पाण्यावर धरणगाव पालिकेची सावकारी ; टँकरवरील कर्मचाऱ्यांकडून लुटमार

dharangaon water tank1

 

धरणगाव (प्रतिनिधी) घोटभर पाण्यासाठी मागील दोन महिण्यापासून धरणगावकरांचे हाल सुरूच असून, अनेक भागाची तहान टँकरवरच भागवली जात आहे. ही भीषण परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र, या भीषण पाणी टंचाईचा फायदा घेत पालिकेच्या टँकरवरील कर्मचाऱ्यांकडून धरणगावकरांची लुटमार सुरु असल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होतोय. एकंदरीत धरणगावात पाण्यावर पालिका प्रशासनाची सावकारी सुरु असून पालिका मुख्याधिकारी ‘अर्थ’पूर्ण कानाडोळा करताय,असा आरोप देखील होतोय. तर पालिका अधिकारी व राजकारण्यांची पाण्याची व्हीआयपी सोय करावी लागते, असे धक्कादायक माहिती पालिका कर्मचाऱ्यांनीच दबक्या दिलीय. विशेष म्हणजे ही सर्व माहिती दुष्काळग्रस्त धरणगावकरांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखीच आहे.

 

 

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारण आराखडा अगदी सूक्ष्मपणे राबविणे सुरू केले आहे. ग्रामीण भागातील जलस्त्रोत आटले असून, नागरिकांची तहान भागविण्यासाठी आता पालिका प्रशासनकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु मागणीवरून नागरिकांना पालिका पुरवीत असलेल्या टँकरवरील कर्मचाऱ्यांकडून जबरदस्त लुटमार सुरु असल्यामुळे धरणगावकरांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी उन्हाळ्यात टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालिका आणि एमआयडीसी या दोन्ही यंत्रणांकडून टँकर भरून घेतले जातात.

 

 

धरणगाव तालुक्यात नेहमीप्रमाणे पाण्याची गंभीर परिस्थिती आहे. साधारण महिन्यातून एक-दोनदाच शहराला पाणी पुरवठा होतोय. तसेच गावातील बोअरवेल देखील मोठ्या प्रमाणात आटल्या आहेत. त्यामुळे पालिकेकडून मागणी प्रमाणे शहरात पाणी पुरवठा केला जातोय. परंतू टँकरवरील कर्मचारी उघड-उघड लुटमार करत असल्याची ओरड होतेय. टँकर नागरिकांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जातात. त्यानुसार १५० रुपयात एक टँकर पाणी नागरिकांना दिले जाते. परंतू टँकरवरील कर्मचारी ४५० ते ५०० रुपये घेत असल्यामुळे धरणगावकरांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. एवढेच नव्हे तर, लग्न असलेल्या लोकांकडून तर अर्जंट म्हणून ७०० ते १००० रुपये घेतलेय जाताय.

 

 

बेकायदा बांधकामांसाठी पाणी पुरवठा

घोटभर पाण्यासाठी मागील महिनाभरापासून धरणगावकरांचे हाल सुरूच असून, अनेक भागाची तहान टँकरवरच भागवली जात आहे. ही भीषण परिस्थिती असताना बेकायदा बांधकामांचे इमले उभारण्यासाठी शहरात खुलेआम टँकरचा काळाबाजार सुरू असल्याचा देखील आरोप होतोय. धरणगाव पालिकेकडून एका टँकरसाठी १५० रुपये दर आकारला जातो. त्यात एक ते दीड हजार रुपये वाढ करून अनधिकृत व नव्या बांधकामांसाठी त्याची जोरदार विक्री सुरू असल्याचा आरोप देखील होतोय. दरम्यान, वाढीव दारात पाणी टँकरचे पाणी देण्याकडे पालिका मुख्याधिकारी ‘अर्थ’पूर्ण कानाडोळा करताय,असे देखील काही जणांनी सांगितले. रात्रीच्या अंधारात हे टँकर बांधकामस्थळी पाठविण्यात येतात, असे देखील कळतेय.

 

 

पालिका अधिकारी व राजकारण्यांची व्हीआयपी सोय

भीषण पाणीटंचाईमुळे पालिका टँकरद्वारे पाणी पुरवते. मात्र, हे पाणी राजकीय पुढारी आपापल्या भागात वळवत असल्याच्या आणि या टँकरच्या कोणत्याही नोंदी नसल्याच्या तक्रारी आहेत. जनहितासाठी पाणी नेत असल्याचे सांगत राजकारणी आपापल्या घरी किंवा नातेवाईकांडे टँकर फुकटात नेत असल्याची देखील चर्चा आहे. मात्र, आपल्या पदाचा दुरुउपयोग करून प्रत्येक नेता व अधिकार्‍याने मनमानी केली आणि दबाव आणला तर नियमानुसार गरजूंपर्यंत पाणी पोहोचणार कसे? हा खरा प्रश्न आहे. अशा प्रकारे पाणी नेण्यात सर्वच पक्षांचा वाटा असल्याचे दबक्या आवाजात कर्मचारी सांगतात. सर्वसामान्य धरणगावकर थेंबभर पाण्यासाठी पायपीट करत असतांना पालिका अधिकारी व राजकारण्यांना व्हीआयपी सोय करणे कितपत योग्य आहे? असा सवाल देखील नागरिक विचारू लागले आहे.

Add Comment

Protected Content